जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असलेल्या एका देशात पुरोगामी आणि अव्वल समजल्या जाणार्या राज्यात सुमारे साडेदहा कोटी लोक राहतात. त्यापैकी जवळपास साडेसहा कोटी लोक सज्ञान असून त्यांना मतदानाचा हक्क आहे. त्यांच्यापैकी निम्म्या तरी लोकांना या मतदान बितदान वगैरे गोष्टीत काडीचा रस नाही. त्यामुळे उरलेले तीनसाडेतीन कोटी लोक आपल्याला पाहिजे तो उमेदवार निवडून आणतात. म्हणजे ते मत देऊन मोकळे होतात. तो उमेदवार कुठल्या पक्षाचा यावर सत्तेचं गणित ठरतं. पाचेक र्वष काही पक्ष राज्य करतात. उरलेले त्यांना जमेल तसा विरोध वगैरे करतात. पुन्हा पाच वर्षांनी ये रे माझ्या मागल्या.. हे राज्य अर्थातच महाराष्ट्र आहे. आपला महाराष्ट्र. चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेला. सहय़ाद्रीच्या कुशीत नांदणारा. समुद्राचा शेजार लाभलेला. मुंबईसारखी व्यापारीपेठ मोठय़ा अभिमानानं सांभाळणारा आपला महाराष्ट्र.
या घटकेला अख्ख्या महाराष्ट्रात निवडणुकांचं वातावरण आहे. त्यातच दिवाळीही येते आहे. काही राजकीय पुढार्यांना हे संकट वाटतं आहे, काही नेत्यांनी सुस्कारा सोडला आहे. नोकरशाही वंगण घातल्यासारखी घुळघुळत चालली आहे. निवडणूक आयोगाच्या यंत्रणेला जुंपले गेलेले कर्मचारी लगबग करत आहेत. मतदान यंत्रांवरून मध्यंतरी बरीच बोंब
bgcolor=black>
लोड होत आहे...